STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

शिस्त....

शिस्त....

1 min
247

हवं ते मिळवण्यासाठी,करावी नियोजनबध्द वाटचाल,

संस्कार व आचाराने करावी, ही शिस्तबद्धतेची चाल

यशस्वी माणसांची असते, आपल्या इच्छेवर सत्ता,

ओढाळ मन अनिच्छेने चालतं, घालवते कृतीचा मत्ता

स्वतःला शिस्त लावून, मेहनतीची दाखवा तयारी,

अशी माणसं योग्य वाटेवर, तीच गाठतात यशाची वारी

टंगळमंगळ करणारी, यशापर्यंत पोहचत नसतात,

यश नसते ताकदीवर, ते शिस्तीच्या बळावर मिळवतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational