शिक्षक 'म्हणजे
शिक्षक 'म्हणजे
शिक्षक 'म्हणजे एक समुद्र , ज्ञानाचा,......
पवित्र्याचा, एक आदरणीय कोपरा,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला......
शिक्षक अपुर्णाला पूर्ण करणारा.....
शिक्षक, शब्दांनी ज्ञान वढविणारा,
शिक्षक, जगण्यातुन जिवन घडवणारा,
शिक्षक तत्वातून मुल्ये फ़ुलवणारा.....
ध्येय दिसते, तिथे नेतो शिक्षक,
सत्य ते, शिकवतो, वदवून घेतो तो शिक्षक,
ज्ञानाची ओळख.... पुर्णत्व म्हणजे शिक्षक,
निस्वार्थ तळमळीने शिकवितो तो शिक्षक.....
शिक्षा एक नावडते अंग शिक्षकाचे,
त्यातून ही ध्येय असते ज्ञान देण्याचे,
शिक्षक अचरणातुन ही शिकवत असतो,
म्हणूनच शिक्षक पूर्ण असावा लागतो......
नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो अन् घडवितो तो शिक्षक......
