शेवटची मिठी....
शेवटची मिठी....
मिठीतल्या अनमोल प्रेमाचे
क्षण असतात दोन
एक असतो बोलका
तर दुसरा असतो मौन
सुसाट वाऱ्याच्या तरंगावर
गात असतात पक्षी
ओरडत की रडत असतात
याची माहिती नाही स्तिथी
आपण क्षणात हरपून गेलो
प्रेमाच्या अबोल भावनेत
थोडया अरसट थोडया चावट
पण त्याही केवळ यातनेत
एकमेकांसाठी मनसोक्त रडू
बनून हिरवीगार रवंत
पण गालावर अश्रू नाही दिसत
याचीच आहे ग वेडी खंत
काय या न संपणाऱ्या दुराव्यातले
अबोल आहे ते गोड शब्द
तूझ्या ओठांच्या मधातली रेघ मात्र
करते मनाला आजही स्तब्द
आयुष्याच्या सुखात तूच बनली
माझी मात्र अबोल साथीदार
पण वाटलं नव्हतं वेगळं होताना
तूच बनशील मिठीची खरी भागीदार
म्हणून मिठीतल्या अनमोल प्रेमाचे
क्षण असतात दोन
एक असतो अबोल बोलका
तर दुसरा असतो मौन.