STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy

3  

Vijay Sanap

Tragedy

शेतकरी

शेतकरी

1 min
1.8K


बाप महा शेतकरी

काळ्या मातीत राबतो

घाली भूई आड दाणा

स्वप्न उद्याचे बघतो ।।


काळी माय तहानली

ओढ लागे मिरगाची

माय जागून उठते

कानी बोली चातकाची ।।


बीज अंकूर फुटला

काळ्या ढेकळा आडूनं

वाट पाहे पावसाची

कुठं बसला दडूनं ।।


आस बांधते उरात

राब राबतो रानात

तळपत्या उन्हामधी

सारा भिजतो घामात ।।


अख्या जगाचा पोशिंदा

नाव त्याचे शेतकरी

रात दिस राबुनीया

नसे पोटाला भाकरी ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy