शेतकरी माझा बाप
शेतकरी माझा बाप


शेतकरी आहे माझा बाप
त्याच्या कष्टाचे नाही मोजमाप
गाळूनि शेतात घाम
राब राब राबतोय माझा बाप
असतील कितीही संकट त्याच्यासमोर
लढतोय त्यांच्या समोर सर्वांच्या अगोदर
आला आहे जरी कोरोना तरी
ऊन्हात घाम गाळतोय शेतावरी
शेतात राब राब राबून पिकवतोय
घरी बसलेल्या सर्वाना जगवतोय...