STORYMIRROR

vaishali vartak

Action Inspirational Others

4  

vaishali vartak

Action Inspirational Others

शेतकरी दादा

शेतकरी दादा

1 min
397

येता कृष्ण मेघ नभी

बळीराजा येतो मनी

झटकूनी आळसाला

शेतकरी उभा झणी


काळ्या मातीला कसूनी

करी शिवार तयार

वाट पहाती लोचने

मृग पावसाची फार


मृग धारा बरसता

तृप्त होते काळी माय

कृपा होता वरुणाची

शेतकरी मागे काय


शोभिवंत भासे शेत

मोती जणू कणसात

देवाजीच्या प्रसादाने

सुख येते शिवारात


पीक येता भरघोस 

मोल मिळते कष्टाचे

दिसे दारी धान्य रास 

दिन येती आनंदाचे


जीवनात कष्ट फार

देश हा कृषीप्रधान

काम बळीचे महान

 पोशिंद्याचा जगी मान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action