STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

शेतकरी आणि आंदोलन

शेतकरी आणि आंदोलन

1 min
277

शेतकरी आंदोलन हक्कासाठी 

कृषीकायदा आहे म्हणे शेतीसाठी 


त्याच्या आडून नेमके दडले तरी काय 

त्यासाठी तर शेतकरी मागतो न्याय 


धनदांडगे यांचे हीत जपणार हाय 

शेतकरी उपाशी मरणार हाय 


अधिकार त्याचे संपणार हाय 

केव्हाही भूमीहीन होणार हाय 


देशातील शेतकरी मालक हाय 

सरकार म्हणतेय आम्हीच हाय 


शेतकरी गुलाम होणार हाय 

पुढील पिढ्या बेकार होणार हाय 


शिकून नोकर्या मिळणार काय 

शेतीत मजूरी संपणार हाय 


शेतकरी भारतात दिसणार काय 

औद्योगिक वसाहत होणार हाय 


शेतीप्रधान स्वप्न भंगणार हाय 

शेती व्यवसाय नष्ट होणार हाय 


उद्योगपतींचा देश होणार हाय 

गरीबांना जगणे अवघड हाय 


भांडवलशाही नांदनार हाय 

श्रीमंत अति श्रीमंत होणार हाय 


बेरोजगार इथे होणार हाय 

लोकशाही इथे नांदणार नाय 


गुलामांची संख्या वाढणार हाय 

कायदे त्रासाचे लादणार हाय 


निरपराध शेतकर्यानी केले काय 

त्यांच्यावर षढयंत्र रचले हाय 


अमानुष बळी गेले की नाय 

शेतकरी गुन्हेगार ठरवला हाय 


भूसंपादन हक्क शेतकर्याचा 

 नाही कुणाच्या कधी बापाचा 


 सत्य अग्निपरिक्षा पार करतो 

 लढा सत्याचा यशस्वी होतो 


जुलूम,जबरदस्ती अन्याय हाय 

न्याय हक्क मागणे का गुन्हा हाय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational