STORYMIRROR

Sayali Gore

Classics

2  

Sayali Gore

Classics

शब्द!

शब्द!

1 min
344

रडता-रडता हसायला शिकवलं या शब्दांनी

पडता-पडता सावरायला शिकवलं या शब्दांनी


कधी-कधी घात केला या शब्दांनी

तर कधी आयुष्याची साथ मिळवून दिली या शब्दांनी


मनाच्या तारा जुळाल्या या शब्दांनी

तर कधी चढला पारा या शब्दांनी


गोड आठवणी जपून ठेवल्या या शब्दांनी

तर कधी डोळ्यात पाणी आणले या शब्दांनी


म्हणूनच म्हणते,

जगायला शिकवलं या शब्दांनी 

जगायला शिकवलं या शब्दांनी!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics