STORYMIRROR

Sayali Gore

Others

3  

Sayali Gore

Others

कधीतरी

कधीतरी

1 min
195

कधीतरी असं वाटतं...

कॉलेजच्या त्या कट्टयावर

चारचौघात एकटं बसण्यापेक्षा

होस्टेलच्या खिडकीत

आल्याचा फक्कड चहा पित बसावं...


कधीतरी उगाच जाऊन चौपाटीवर बसावं

आणि सोबत कुणीच नसावं;

फक्त "येतो गं" असं म्हणणारा तो मावळतीचा सूर्य

आणि "अगं वेडे, वाहत रहा... एकेदिवशी किनारा नक्की मिळेल" असं म्हणणाऱ्या त्या लाटा...



Rate this content
Log in