STORYMIRROR

Sayali Gore

Others

3  

Sayali Gore

Others

प्रेम की गुन्हा

प्रेम की गुन्हा

1 min
113

माझी एक ताई आहे

तिचा एक मित्र होता


एके दिवशी सहज आईला विचारले;

'त्या दोघांनी लग्न का नाही केले?'


आई म्हणाली त्यांचं प्रेम वेगळं होतं!


मी म्हणाले,"आई,प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं;

तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं!"


माझी शेवटची ओळ कापत आई म्हणाली

"बाळ हे सगळं खोटं असतं!"


त्या दिवशी कळाले प्रेमाचेसुद्धा प्रकार असतात!

जे प्रेम समाजाला "मान्य" ते "प्रेम"

जे प्रेम समाजाला "अमान्य" तो "गुन्हा"


Rate this content
Log in