शाळा
शाळा
लहान लहान मुलं आम्ही
सर आम्हाला शिकवायचे
छान होती शाळा आमची
आमचे खूप मन रमायचे..!
पुस्तके होती पाटी होती
होती छान पाण्याची बॉटल
दप्तर होत लहाणच त्यात
त्यातच ठेवायचो बॅटबॉल..!
शाळेत खेळतांनी लक्ष होते
जाऊ लपाछपी खेळायला
जेवनाची सुट्टी होताच तिथे
जेवन पण छान खायला..!
सुट्टी व्हाव आम्हाला असं
कधीच वाटत नसायचं
शाळेमध्ये फक्त आमचं
खेळण्यातच मन असायचं..!
