Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vanita Shinde

Inspirational

4.0  

Vanita Shinde

Inspirational

सच्चा पोलिस शिपाई

सच्चा पोलिस शिपाई

1 min
998


*अभंग*


*सच्चा पोलिस शिपाई*


खाकी वर्दी अंगावरी

शोभून दिसते भारी

रात्र नि दिवस जारी

तैनात कामावरी//१//


दंगल असो कुठेही

सणालाही सुट्टी नाही

नि:स्वार्थीपणे तो वाही

समर्पित जीवन//२//


देश बांधवांची सेवा

कर्तव्याचा मनी ठेवा

वाटतो सदैव हेवा

अशा पोलिसाचा//३//


देश असे परिवार

देशासाठी झेली वार

विश्वासाची घट्ट दोर

टिकवतो पोलिस//४//


अन्याय वा अत्याचार

टाळतो तो व्यभिचार

बनत नाही लाचार

जपण्या स्वाभिमान//५//


गरिब श्रीमंत जन

मानून एक समान

कायद्याचा करी मान

एक सच्चा पोलीस//६//


देशाची राखण्या शान

बाळगतो अभिमान

रक्षणार्थ देतो प्राण

तोच सच्चा पोलिस//७//



Rate this content
Log in