सौभाग्य माझे :-ज्ञानदान
सौभाग्य माझे :-ज्ञानदान
सौभाग्य माझे फार
मी ज्ञानदान करते
चिखलाच्या गोळ्यांना
आकार देऊन घडविते ||
पवित्र अशा मंदिरात
चिमुकली अशी मुले
त्यांच्याच कलकलाटाने
सुगंध विद्यालयात फुले ||
पवित्र अशा ज्ञानमंदिरात
शिकवताना येतो हरूप
कौशल्ये मनी रुजुनी
खुलविते विद्येचे रूप ||
चांगले करुनी अध्यापन
विद्यार्थ्यांना घडविते
ज्ञानदान छान करूनी
संस्कारांनी मडविते ||
ज्ञानरचनावादाने करते
अध्यापण सदा आनंदात
घडवी सुजान नागरिक
पुढील भविष्यकाळात ||
विद्यार्थ्यांना घडवुनी
करते जीवन सार्थ
यशाची पहाट दावुणी
मानते शिक्षकाला अर्थ |