सैराट
सैराट
ओढ लागली फक्त तुझ्या सोबतीची
संसार आपला नव्याने थाटायचा आहे
तुझ्यासवे सैराट होऊन
पुन्हा एकदा जगायचं आहे
बेधुंद मन होऊनी बेभान
मुक्त हवेत श्वास मला घ्यायचा आहे
तुझ्यासवे सैराट होऊन
पुन्हा एकदा जगायचं आहे
विरहाचे हे क्षण आणखी न सोसवे मना
तुजसमीप येऊन मनीचे गुज सांगायचे आहे
तुझ्यासवे सैराट होऊन
पुन्हा एकदा जगायचे आहे
मुसळधार बरसणाऱ्या पावसाच्या धारेत
ओलेचिंब होऊन मला भिजायचं आहे
तुझ्यासवे सैराट होऊन
पुन्हा एकदा जगायचे आहे
तमा न मजला स्वार्थी या दुनियेची
तूच आहेस माझा अभिमानाने सांगायचं आहे
तुझ्यासवे सैराट होऊन
पुन्हा एकदा जगायचं आहे
तुझ्यासवे सैराट होऊन
पुन्हा एकदा जगायचं आहे