सैनिकाची दिवाळी
सैनिकाची दिवाळी
मायबाप ओसरीवर बसून
दुर गेलेल्या लेकराच्या
चिंतेत बसतात
दाराआड डोकावून पोटतिडकीने लेकराची वाट पाहत असतात
निरोप देवून वाट पाहूनही
सणासुदीला तो घरी येत नाही
त्याच्याशिवाय घरच्यांना
एक घासही गोड लागतं नाही
कारण
भारतमातेच्या आणि
भारतीयांच्या रक्षणासाठी
तो सिमेवर तैनात असते
तेव्हा कुठे प्रत्येकाच्या
मांगल्याचा घरात दिवा पेटतो
प्रत्येकाच्या घराघरात
गोडधोड रोषणाई
फटाक्यांची आतिषबाजी असते
सिमेवर लढणाऱ्या सैनीकाच्या घरी
मात्र एक पणतीसुध्दा जळत नसते
प्रत्येक सणाला त्याचही लक्ष
आपल्या गावाकडे असते
आईबाबा घर परिवाराची
विवंचना त्याला स्पष्ट दिसते
मनात त्याच्या खूप वेदना असतात
पण तो कोणालाही सांगत नसतो
डोळ्यातून अश्रु येवू न देता
खोटं खोटं हासतं असतो
सारकाही सहण करूनही
तो फिकीर कसलीच करत नाही
सण उत्सव असलातरी
सुखासुखी त्याला गोडधोड भाकरिची चिंता नाही
पण सारकाही विसरून तो
देशसेवेलाच महत्त्व देतो
लखलख दिव्यांनी उजळलेला
भारत देश सिमेवरु पाहत असतो
तेव्हा त्या सैनिकाचे मायबाप
आपलेच समजून
त्यांच्याही घरी समृद्धीची
रोषणाई करूया
गोडधोड खाऊ घालुन
त्या विर सैनिकांच्या
दिर्घायुष्यासाठी मांगल्याच्या
पणत्या पेटवूया
