STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

सावली

सावली

1 min
170

प्रेम दिसत नाही

आशिर्वाद दिसत नाहीत

देव तरी कुठे दिसतो

मनाच्या कप्प्यात 

असणाऱ्या या गोष्टी

पण सगळंच चालतं

 जेव्हा भरोशांवर

प्रकाश पडतो पण 

प्रकाश वाहताना कुठे दिसतो

काही गोष्टींचे मूळ शोधू नये

वृक्षाची सावली 

अनुभवायची असते

शोधायची नसते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract