STORYMIRROR

Rajesh Varhade

Fantasy

2  

Rajesh Varhade

Fantasy

सावित्रीबाई

सावित्रीबाई

1 min
13

अज्ञानांना सुज्ञ बनवले 

त्यागुनी संसार 

शूद्रांच्या न्यायासाठी 

झालीस तू तलवार


अन्याय केव्हाचं 

केला ना सहन 

उठवले जाणुनी 

शिक्षणाचे ग्रहण


न्याय स्त्री जातीचा 

मिळवून दिला 

गौरव आई पणाचा 

जगाशी दाखवला


खरी शोभली ज्योतिबाची 

अर्धांगिनी वंदन

तुला मुजरा ही घ्या 

आदर्श ठेवा जपून


झाशीची राणी सर्व रूपे 

तुझीच स्त्रीमाते 

लाचार ना तू केव्हा 

हो पुढे करण्या दोन हाते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy