Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Inspirational Others

3  

Sangita Pawar

Inspirational Others

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

1 min
180


झिजवून आपुली काया

क्रांतिज्योती सावित्रीने

ध्येय स्त्री शिक्षणाचे

ठेवीले विद्या दात्रीने ||


पतीच्या मार्गदर्शनाझाली

सावित्री माय शिकली

पहिली स्त्री शिक्षिका

बनुन शाळा चालवली ||


वसा ज्ञानार्जनाचा 

जन्मभर तिने घेतला

विधवांच्या जीवनात

नवा मार्ग दाखविला ||


मायअनाथांची झालीस

मोडीत काढला पुनर्विवाह

शोषितांचे करुनी सुटका

थांबविलास शूद्रांचा दाह ||


 अनिष्ट प्रथा बंद करण्या

 झेलला विरोध समाजाचा

तुझ्या कठोर परिश्रमाने

मार्ग दाखवला प्रगतीचा ||


सती केशवपन थांबण्या

प्रयत्न सदा तिने केला

विधवेचे करुनी बाळांतपण

अनाथ आश्रम खोलला ||


प्लेगग्रस्तांची करुनी सेवा

प्राण गेला सावित्रीचा

त्रिवार मुजरा करूनी

माय सावित्रीला मनाचा||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational