STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

सावित्री

सावित्री

1 min
1.0K

सावित्रीची वाचून गाथा

घेतला निर्णय शिकण्याचा

ध्येय,जिद्द ठेवून मनात

स्पर्धेत सध्याच्या टिकण्याचा....!!


तपासून,तार्किक करते विचार

विज्ञानाची मजला असे आवड

पुस्तक माझे खरे मित्र

त्यासाठी मी काढते सवड.....!!


सावित्री मुळेच शिकल्या नारी

सर्वच क्षेत्र प्यापूनी टाकले

तुझेच उपकार साऊ मजवरी

म्हणूनच स्त्री वर्ग समस्त शिकले...!!


तुझीच मिळाली प्रेरणा मजला

सक्षमपणे आहे आज उभी

प्रगतीचे पंख लावून मीही

घेतली झेप उंच नभी......!!


तुझाच घेतला करारी बाणा

झाले मी शिक्षिका आज

ज्ञानाचे अमृत पाजण्या सज्ज

माझ्यावरी आहे मला नाज....!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational