साथीची मिठी...
साथीची मिठी...


आज म्हातारपणाच्या आठ्या
इतक्या वर्षाच्या संसाराला
दुःखाचा डोंगर कितीही मोठा
एकमेकांना आधार जगण्याला
उतारवयात आपल्या प्रेमाश्रूंना
सांत्वनाची मायाळू सावली
सोबत आठवणींच्या वाटेवर
होऊन एक-दुसऱ्याची माऊली
निरागस स्पर्शाचा बोलकेपणा
सुखानंदाने अनुभवता यावा
सोबतीचा प्रेमळ हात न मागता
आयुष्यभर हातात असावा
अबोल भावभावना कळण्यास
कायम साथीची मिठी मिळावी
आपुलकीची माया दाखवण्यास
वयाची मर्यादा कधीच नसावी