साथ तुझी
साथ तुझी
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ,
साथ मला तुझी हवी.
असो सुख वा चटके उन्हाचे,
तुझ्या सोबती ची सावली हवी.
वाऱ्या सोबत पळताना,
चिंब पावसात भिजताना,
साथ तुझी मला हवी.
येतील किती जरी संकटे,
सोडून ना जाशील ऐकटे,
आश्वासक ती वचने हवी.
आनंदात हसताना,
अन दुःखात रडताना,
साथ तुझी मला हवी.
तुझ्यावर प्रेम करताना,
सुंदर आयुष्याचे स्वप्न पाहताना,
तुझी अन फक्त तुझी साथ मला हवी.
भरकटले रे तारू माझे,
गाठावया किनारा,साथ तुझी हवी.

