साथ तुझी
साथ तुझी
साथ तुझी आयुष्याच्या अंती,
हा विश्वास आहे नाही भ्रांती
कोणी नसले तरी चालेल,
हात राहो तुझा माझ्या हाती
दुरवर केला हा प्रवास,
खडतर होता तरी आज
सोडली सर्व नाती मागेच,
आली आयुष्याची आता सांज
तू माझी मी तुझा हेच जिणं,
हेच रे आहे मागणं आज
जिंदगी एकटीच शेवटी,
एकलाच प्रवास अखेर
तू आणि मी मिळुनच राहु
जीवनाच्या आखरी प्रहर

