STORYMIRROR

Deepali Mathane

Romance

4  

Deepali Mathane

Romance

साथ शतजन्मीची

साथ शतजन्मीची

1 min
429

सप्तपदी च्या वाटेवरती

साथ असे ही शतजन्मीची

कुमारिका ती वधू जाहली

भाबडी निरागस मनीची

   अवखळ ,अल् लड ,लाडाची

   काळीज ती मायबापाची

   जनरितीच्या नावाखाली

    प्रथा चाले विरहाची

नवजीवनाची रंगवली 

स्वप्ने जीने सुखसौख्याची

तुझ्याच साथीने मोहरेन

व्याख्या तिच्या प्रीतीची

  अनेक नाती मागे सोडून

   चालली तुझ्या पायवाटेवर

   स्वःस्वप्नांना बाजूला सारून

   संसार फुलवण्या वेदीवर

जाण असावी जोडिदारा

तिच्या निरागस भावनांची

प्रेमाने उमगून घ्यावी कधी

 जाण तिच्याही स्वप्नांची

    अवचित वादळे येतीलही

    तू थोडे सावरून घेशील

    घाबरली ती तरी साजणा

    आधारवड तीचा होशील

तुझ्यासोबतची नाती ही

 ती आपलीशी करील

तुझ्याच साथीने साजणा

 सुख चित्र नवे रंगेल.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance