STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

सांजवेळी

सांजवेळी

1 min
138

लगबग ही पक्षांची 

घरी हो परतण्यास 

सूर्य ही आहे तत्पर 

ढगा आड लपण्यास 


अंधाराची ही चाहूल 

दिन हि मावळण्यास 

मंद प्रकाश उजडे 

चोहिकडे दाटण्यास 


सांजवेळी निसर्गात 

मोहे आकाश रंगीत 

सूर्या भोवती पसरे 

काठ सोनेरी नभात 


रम्या वाटे सांजवेळ 

रूप हे विलोभनीय 

घेई विसावा आकाश 

शीत छाया ओढूनिय 


वेळ दिवेलागणीची 

शांत निवांत एकटी 

कडू गोड आठवणी 

मनी वसे चटपटी


निसर्गाशी एकरूप 

आठवणी झोक्यावर 

सवंगडी गोळा होई 

गप्पा रंगे चवदार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational