सानिध्याचा रंग...
सानिध्याचा रंग...
सानिध्याची साथ प्रेमळ
भावनांचा सगळा पिंगा
जीवाचा प्रीत नंदनवन
रंग माझा प्रेमाचा रिंगा
स्वप्नवत लुप्त आठवणी
स्वाधीन कुशीत बेधुंद
संवाद हलके फुलके
रंग माझा प्रेमाचा धुंद
आलिंगनाचं मनी गुंफण
नात्यातला सुवासी बंध
सोबतीचा मोरपिसारा
रंग माझा प्रेमाचा गंध