STORYMIRROR

Shobha Wagle

Tragedy Action Children

3  

Shobha Wagle

Tragedy Action Children

सांगायचे मला

सांगायचे मला

1 min
200

बोलू कशी सांगू कशी

काहीच मला कळेना

तुला कसे सांगायचं

माझे मलाच जमेना


रोज मनी मी चिंतीते

आज तुला सांगायचे

मनोमनी मी ठरविते

पण शब्द न सुटायचे


केला आज निर्धार 

सांगून टाकायचं पार

खंत किती सहन करू

झुरत आले मी फार


कुणीतरी टाकलं होतं

जीव माझा राहवला नाही

बाळ म्हणून साभांळलं

कुणाला वाटलं नाही काही


माय ममतेने वाढवलं

संस्कारांनी घडवलं

यश किर्ती संपादली

नाव जगात कमावलं


आता जीव सुखावला

खंत नाही माझ्या मनाला

समजून घे मला आणि 

दाखव अभिमान जगाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy