सांग सखे ह्या वाऱ्याला
सांग सखे ह्या वाऱ्याला
सांग सखे ह्या वाऱ्याला,
उडवीत तुझ्या बटांना निघुनी गेला
सोबोट गंध तुझा मला देऊनी गेला
सांग सखे ह्या लाटांना,
उसळत लाटा येती सागर हा मधुर झाला
नयानी तुझे हे सारे कसा गंधित हा झाला
सांग सखे पाण्याला,
रूप तुझे पाहता या निर्मळ या जलात
उडती दवबिंदू हे क्षितिजा मध्ये पसरला
सांग सखे या पावलांना,
हात तुझा हात घेऊनी सुख मिळाले मला
अशीच साथ मिळाली मला येथून परततांना
सांग सखे या किनाऱ्याला,
उडती अंगावरील ही पाण्याची लहरे
लेट शांत होताच येई अंगावरी शहारे
सांग सखे या तुझ्या मंद सावल्यांना,
बघुनिया सावल्यांना ढगातला लपे चांदोबा
नको सांगू गूज गोष्टी माझ्या या चांदोबाला

