STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

3  

Meenakshi Kilawat

Romance

"साक्षात्कार प्रीतीचा"

"साक्षात्कार प्रीतीचा"

1 min
256

प्रेम करीते तुझ्यावर,गीत ओठी तुझेच येते,

आली गेली वादळे,राखून ह्रदयात ठेवते......


दाटला वसंत ह्रदयी,पसारा मनी प्रेमाचा,

तरी मनी माझ्या, भास होई सावलीचा.......


माझ्या एवढे असेल कां प्रेम तिचे माझेवरी

करणार आहे कां ती ,राज्य माझ्या ह्रदयावरी...


प्रेमात पडल्यावर असच कां होतय मला

तरी वेड्या माझ्या मना,कां लागावा लळा .....


मजकडे ती नेहमी यावे,असे मला वाटते,

भेट दुरुन ही होता ,मनास समाधान लाभते .....


न दिसता ती कुठेच, काहूर उठते मनोमनी,

पहावे जवळून तिला,वाटे मज क्षणोक्षणी .....


साक्षात्कार प्रीतीचा,भेट रस्त्याचे आडोश्याला, 

वाटे व्हावी नजरानजर,चुकवून घरच्याला .....


कधी असे प्रेमाची,वेगळी धग शब्दाला,

कधी होई विचलीत मन,ते पडता कानाला ......


गुप्त प्रेम मनातल,कां सांगु वाटे तिला,

हाच एक ध्यास ,कां असतो मनाला ......


सहज फिरकलो मी,त्या निलगीरी बागेला,

उजाळा मिळाला , माझ्या नव भविष्याला .....


इथेच दिला शब्द तिने ,नयनी लाजून प्रेमाचा

घेतला अखेर कानोसा,येथे माझ्या मनाचा .... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance