STORYMIRROR

Varsha Patle Rahangdale

Tragedy

4  

Varsha Patle Rahangdale

Tragedy

साजणा

साजणा

1 min
435

तुझ्या भेटीच्या आशेवर हे आयुष्य काढत आहे

तू येशील एकदातरी हीच आस बाळगत आहे ।।


निराश करणार नाहीस तु मला साजणा

शोधू नकोच आता तू नवा कुठलाही बहाणा।।


स्पर्श तुझ्या बाहुपाशाचा सुखावून जाते मन

अर्पण केले होते साजणा तुलाच तन मन धन।।


साजश्रुंगार केला फक्त तुझ्याचसाठी वेड्या

का कधीच कळले नाही मन तुला माझे वेड्या।।


धुक्यातही चाहूल तुझी लागताच मन सैरभैर होते

तुझा आभास होताच ओठी नकळत हसु येते।।


कातरवेळी आठवणीने तुझ्या डोळे पाणावतात

तू येशील नक्कीच भेटण्या हे वाटेवर बघतात।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy