साडेतीन शक्तीपीठ
साडेतीन शक्तीपीठ
साडेतीन शक्तीपीठ तीर्थ महान
तीन पूर्ण शक्तीपीठ, एक असे अर्ध
महाराष्ट्राची झाली धन्य, भूमी पावन
दुःख सारे दूर होई कार्य सिद्धी
होई दर्शनानं
कोल्हापुरी कर्पूरवासिनी अंबेचे पहिले पीठ
काळ्या दगडाने दिसे सुंदर सुशोभित
तुळजापूर क्षेत्री आई भवानीचा वास
दुसरे शक्तीपीठ असा त्याचा लौकिक
एकवीस दिवसांचा उत्सव नवरात्रीस सुरवात
शिवरायांची असे कुलस्वामिनी, मोठा थाट
माहूर गडची रेणुकामाता हे तिसरे पीठ
परशुरामाची म्हणती तिला माता
देवगिरीच्या यादव राजाने बांधिले राऊळ
नाशिक क्षेत्री अर्धे पीठ देवी सप्तशृंगीचा निवास
सह्याद्रीच्या सात शिखर रांगा म्हणे सप्तशृंगीचा गढ
वणी असे ते सुंदर विलोभनीय तीर्थस्थान
महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीचे ते एक रूप
शुंभनिशुंभ महिषासुर संहारा नंतर वणी क्षेत्री केले तप
साडेतीन शक्तीपीठ यात्रा करीता मिळे मनवांचीत फळ
विघ्न सारे होई दूर सुख समृद्धीचा येई पूर
