लक्ष दिव्यांनी सजले अंगण...
लक्ष दिव्यांनी सजले अंगण...
लक्षदिव्यांनी सजले अंगण
बघ पणती बोले वातीस
उधळू दोघं प्रकाश मोती
उजळूया काळ्या रातीस
लक्ष दिव्यांनी सजले अंगण
बघ पणती बोले वातीस....
सडा रांगोळी तोरण दारी
द्वादशीनी सुरवात गोवत्स
गोधन पूजनाने आगमन
प्रथम दिन हा वसुबारस
लक्ष दिव्यांनी सजले अंगण
बघ पणती बोले वातीस....
झगमगती दारी कंदील सारे
धनवंन्तरी पूजन,धनत्रयोदशीस
धूप दीप नैवेद्य अर्पूनी, बघ
मिणमिणत्या दीपमाळेस
लक्ष दिव्यांनी सजले अंगण
बघ पणती बोले वातीस.....
सान थोर बघ लगबग करती
अभ्यंग स्नान उटणं लावू अंगी
फराळाचा घमघमाट दोरोदारी
चव प्रकार साऱ्या विविधांगी
लक्ष दिव्यांनी सजले अंगण
बघ पणती बोले वातीस....
नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन
श्रीगणेश पूजू करू सुरवात
उडवू फटाके रंगीत सुंदर
फुटती जाऊन गगनात
लक्ष दिव्यांनी सजले अंगण
बघ पणती बोले वातीस....
