प्रिय डिसेंबर
प्रिय डिसेंबर
1 min
217
प्रिय डिसेंबर सज्ज जाहला
नवीन वर्षा तुझ्या स्वागता
आठवांचे मग विणतो जाळे
सुख दुःखाची वीण उसवता
महामारीचे सावट विसरून
ऋणानुंबंधाचे क्षण वेचतो
सुखाचा परिमळ पसरून
मनी आशेचे दीप उजळतो
प्रिय डिसेंबरची थंडी गुलाबी
शेकोटीची अलवार उब घेवून
चमके दवबिंदूचे सुंदर मोती
ओढून धुक्यांचं श्वेत पांघरून
नाताळ सणाची मज्जा भारी
गिरिजाघरावर सजे दीपमाळा
शुभेच्छा भेटवस्तूची रंगत न्यारी
थंडी वाढली आता जरा सांभाळा
आठवण होता मग गतकाळाची
डिसेंबर उभा देण्यास आलिंगन
सुख समृद्धीचा लेवून सुंदर शेला
नवीन वर्षाचे करू अभिवादन
