STORYMIRROR

Ranjana khedkar

Tragedy

3  

Ranjana khedkar

Tragedy

वारांगना

वारांगना

1 min
440

रोज विकून देह स्वतःचा 

करीत असे ती उदरनिर्वाह 

चिखलातही उमले कमळ 

भावनांचा नुसता उहापोह 


मार्ग नसतो मरण्याला अन 

जगण्याची ग झाली जन्मठेप 

लाचार होऊन करी व्यवसाय 

मनावर लावून हास्याचा लेप 


सोळा शृंगारानी रोज सजते

विकून जगते आपली चमडी 

पोटाची खडगी भरण्या मग 

रात्र उलटता कमवी दमडी 


मुखवट्यांनी मिरविणारे मातब्बर

लपून चढती वारांगनेची पायरी 

पावित्र्याचा ओढून खोटा शेला 

रित्या करी माणुसकीच्या घागरी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy