प्राणपक्षी
प्राणपक्षी
आज थोड्या सुमनांची
कर जरा उधळण
प्राणपक्षी तोडू पाहे
प्रेमपाश रुपी क्षण
देह झाले कलेवर
अर्पू अश्रू सुमनं
थोडे रंगीत सुगंधी
फुलं, करूया नमन
आत्मा अमर जाहला
तरी शरीर नश्वर
मोक्ष मिळे जगी जेव्हा
शोधू सर्वात ईश्वर
अंतयात्रा सज्ज झाली
नातीगोती अश्रू ढाळी
घेत निरोप जगाचा
आज चिंता नसे भाळी
स्मित हास्य शोभे ओठी
भाव मुक्ततेचा मुखी
सुमनांचा ल्याली शेला
दर्शनाने झाले दुःखी
अग्निफुलं अर्पू अंती
शेवटची भेट तूला
आठवांचा पूर दाटे
अग माझ्या प्रेमफुला
