क्षण हा सुखाचा...
क्षण हा सुखाचा...
क्षण हा सुखाचा
मनी बिंबवावा
दुःख कापुरा सम
अलगद विरावा
प्राक्तनांचे वाण
पूर्वजन्मीचे भोग
मनी का जडावे
कर्म कर्माचे रोग
चंदना सम शरिर
सत्कर्मानी झिजावा
परिमळ कर्तृत्वाचा
सर्वत्र दरवळावा
आरसे प्रांजळाचे
मन व्हावे दर्पण
निःस्वार्थ सेवेत
जीवन करू अर्पण
परोपकाराचं लेणं
लेवुनिया अंगी
जीवन जगावं
समाधानानं सप्तरंगी
