STORYMIRROR

Vasudha Naik

Abstract

3  

Vasudha Naik

Abstract

रविवार..

रविवार..

1 min
258

आजचा दिन रविवार

विकेंड आहे नेहमीचाच

पण मला बाई हा दिन सुरू

 हो जीवाच्या घालमेलीचा....


माझी लेक गर्भार सात मासाची

आली हो बातमी पहाटेच 

तिला होतोय त्रास याची 

जीव वरखाली माझा नेहमीच...


लेक आहे जयपूरला सध्या

मी आहे पुण्यात राहायला

पुणे जयपूर किती किती लांब

शाळेमुळे वेळही नाही तिकडे जायला...


होतोय खूप त्रास लेकराला

ॲडमीट केले हाॅस्पिटलमधे तिला

इकडे कोणाच्याच जीवात जीव नाही

चैन नाही हो अजिबातच मला....


लेकरू सहन करते माझे एकटेच

तिच्या लेकराची वाट पाहतेय

मी माझ्या लेकरासाठी तरसतीये

आजचा हा असा सुरूवातीचा गेलाय...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract