Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neeraj Shelke

Abstract

3  

Neeraj Shelke

Abstract

रवी मी

रवी मी

1 min
164


सुप्त गुणांना देण्या वाव 

पाहिलं मी डोकावून आत , 

कितीतरी असे विषय 

घोळत पडले होते मनात !!


शुभ्र पांढऱ्या कागदावर 

चित्र जेव्हा काढून पाहिलं , 

माझं मलाच कळत नव्हतं 

असं कसं होऊन राहिलं !!


छानपैकी जमलं चित्रं 

घरातले कौतुक करी , 

अन् त्या कौतुकाने मग 

मनी माझ्या आनंद भरी !!


म्हंटल अजून स्वतःला 

पाहूया जरा निरखून , 

ठिपक्यांची मग रांगोळी 

काढू लागलो हरखून !!


जमली इतकी छान रांगोळी 

बक्षीसं लागली मिळायला , 

माझ्यातले ते सुप्त गुण

लागले मज कळायला !!


अजुनी काहीतरी होतं 

या उराशी दडलेलं , 

ओठांवर येऊनही 

ओठांवरतीच अडलेलं !!


झाली ओळख लेखणीशी 

लिहू लागलो काही काही , 

लिहिता लिहिता इतकं लिहिलं 

जणु वाटे ते माझंच नाही !!


मनातलं मग लेखणी ती 

कागदावर लिहू लागली , 

समाजातल्या अन्यायाला 

वाचा देण्या बोलू लागली !!


बांधला मनाशी चंग 

पत्रकारितेचा घेतला वसा , 

वाटे जिकडे चुकते काही 

तिकडे माझा उमटवला ठसा !!


अजुनी मनात आहे काही 

जे ते स्वतः करू पाही , 

किचनमधल्या स्वयंपाकात 

इच्छा ती गुरफटून जाई !!


बनवणं स्वयंपाक 

ही सुद्धा आहे कला , 

अन् या कलेपासून

मी कसा दूर राहीन भला !!


आजमावला हात इथेही 

पण डाळभाताशिवाय जमेना , 

ओशाळलेलं मन माझं 

मग स्वयंपाकातही रमेना !!


करून पाहिले खूप उपक्रम 

पण जे जे जमेल ते करावं , 

आपुल्या या आयुष्यामध्ये 

आपणच आपलं सुख भरावं !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract