रोड कामगार
रोड कामगार
भाकरीची रोज रात्री झोपतांना कल्पना
लेकरांच्या, आसवांची कष्टतांना कल्पना
डांबराच्या अग्निमध्ये जाळलेली भावना
नोकरीची, डोंगराला फोडतांना कल्पना
अंत नाही संकटांना जीवनाने पोळले
पावसाची, घामबिंदू गाळतांना कल्पना
दोन पैसेही मिळेना रोज गिट्टी फोडता
तांदळाची, बालकाला जेवतांना कल्पना
रक्त माझे आटले हे रोज रस्ते बांधता
गारव्याची, हा उन्हाळा झेलतांना कल्पना
इंग्रजी शाळेत माझ्या लेकराला टाकले
शिक्षणाची, वाढती फी फेडतांना कल्पना
पंकज कसा हा फुले चिखलातही पाहा सखी
शांततेची, वादळांशी झुंजतांना कल्पना
