रंगात रंगले मी
रंगात रंगले मी
शामरंगी गुंतले मी
रासरंगी दंगले मी
वेड्या प्रितीत नाहताना
तुझ्या रंगात रंगले मी....
श्वास गुंतला अंतरंगी
राधारंगी रंगला श्रीरंग
प्रेमडोही डुंबताना
मिठीत विरले अंग अंग....
स्पर्श तुझ्या बोटांचा
केसात अडकून आहे
सरोज पाकळीत अजूनही
भ्रमर गुंतून आहे....
बाहूपाशात विरघळले
भान ही हरपले
शब्द ओठांवरचे
डोळ्यातून वाहिले....
अबोल प्रीतीतून
प्रेमांकुर फुलावा
मिलन रंगातून
भावरंग उधळावा....
वेंधळ्या प्रितीत
मी मोहरुन गेले
हृदय हे गुंतता
तुझ्यात रंगून गेले....
आकाशी भरले
नक्षत्रांचे रंग
रासलीलेत नाचतो
राधेचाच श्रीरंग..

