रंगांच रंग... होळीच्या संग
रंगांच रंग... होळीच्या संग
आपल्या भारतातले सगळे उत्सव भारी
उत्सवातल्या होळीचा मी झालोय पुजारी
होळीच्या उत्सवाची किमयाच न्यारी
सगळे रंग उधळत मी झालोय कैवारी
प्रत्येक रंगाची ओळखच भारी
नाचत उधळत मी खेळतो रंगही सारी
भांडण करणारे लोकही उत्सवात येतात दारी
खरच या होळी सणाची बातच प्यारी
रंगातला राजा म्हणजे असतो लाल रंग
राग आणि प्रेमाच प्रतीक बनतो त्याचा अभंग
उत्तेजनाच प्रतीक बनून करतो तो दंग
चेतवानीचा संदेश देऊन मन करतो तो भंग
कित्येकदा बघूनही डोळे थकत नाही सारी
बनाव वाटत या रंगांचाच कैवारी
रंगांच्या अंश्यावर सगळी दुनिया वारी
मी तर फक्त आहे त्यांचा पुजारी
रंगाची मैत्रीण म्हणजे असते हिरवा रंग
गती आणि चंचलतेची प्रतीक बनून करते मलंग
निसर्गाचा रंग बनून प्रख्यात ते चारी अंग
सकारात्मक ऊर्जा देऊन नेहमी असते ते संग
रंग असतात जणू प्रेमाचे अवतारी
उधळत स्वतः बनून टाकतात कलाकारी
करतात काळ्या गोऱ्याचा फरक नष्ट सारी
जणू एका नवाच देव उतरलाय भूमीवरी
रंगात रंग एक विशाल असा जांभळा रंग
लाल आणि हिरव्याला घेऊन नेहमी तो संग
रहस्यात्मक प्रतीक बनून करतो तो दंग
स्वामींत्व गाजवत तो करतो अपेक्षाना भंग
होळीत हा रंग येतात चेहऱ्यावरी
विसरून जातो मी माझी दुनिया सारी
खरच हे रंग असतात मात्र भारी
कारण उल्हासाचा आहे ठप्पा तिच्यावरी
सगळ्या रंगात अनोखा म्हणजे पांढरा रंग
शांततेला नेहमी घेऊन असतो तो संग
पवित्रता सोबत त्याची उदासीनता करते थोडी दंग
त्याचा मोहकपणा करतो मनाला तंग
खरच या रंगाची बातच भारी
कधी मृत्युत तर कधी उत्सवात असतात सारी
शांतीचा संदेश देत अवतारलाय भूमीवरी
दुरून रंग दिसताच युद्धात नष्ट होतात तलवारी
रंगात राणी म्हणजे गुलाबी रंग
कोमलतेच प्रतीक बनून गाते अभंग
लाल आणि पांढरा नेहमी असतो तिच्या संग
निरागस बनून करतो तिचा अनुभव तंग
प्रेमात डुबवतात ही रंग सारी
मनाला मोहून सगळं विसरवतात भारी
चेतना देऊन बनतात युद्धाचे ललकारी
प्रेमाचे प्रतीक बनून हे बसतात श्रींगारी
आकाशाशी संबंधित असतो निळा रंग
धैर्याच प्रतीक बनून तो नेहमी असतो संग
विश्वासाच प्रतीक बनून तो करतो नेहमी दंग
अश्या या भावपुर्ण रंगात सगळे होतात मलंग
रंगही आपल्याला शिक्षित करतात भारी
दोन रंग मिळून बनवतात नवीन रंगारी
सगळे मिळून राहावं याचा संदेश देतात ही सारी
भेद भाव विसरून बना सगळे एका देवाचेच पुजारी
नजरेआड लपून बसणारा म्हणजे पिवळा रंग
मिलन आणि आत्मीयतेच प्रतीक बनून करतो तो तंग
आनंद व आशावादाच प्रतीक बनून तो उधळतो अंग
ऊर्जा देणाऱ्या या रंगाच्या गोष्ट करतात दंग
होळीची गोष्ट सांगतात कथाकारी
बनून फक्त निम्याचे साक्षीदारी
होळीचा सन नाहीय अविष्कारी
तो तर भेदभाव विसरण्याची पूर्वतयारी
आधुनिक ओळख मिळणारा असा करडा रंग
बुद्धिमत्तेच प्रतीक म्हणून करतो तो भंग
दाखवून वेगळी ओळख तो आपल्यात मलंग
अत्याधुनिक रंग अशी ओळख असतें त्याची संग
रंग असतात स्वतः चित्रकारी
उधळत स्वतःला बनतात ते सूत्रधारी
हसवत स्वतःला चुका करतात वारंवारी
एकमेकात मिसळून बनतात नव अवतारी
भीतीला दाखवणारा असतो काळा रंग
निराषेचा प्रतीक म्हणून कधी असतो तो संग
गुढतेच प्रतीक बनून करतो तो दंग
रंगात रंग अन हा स्वतातच मलंग
होळीच्या रंगाचे गीतकार हजारी
आपला हक्क सांगणारे कित्येक पुजारी
रंगावरून जाती पडतात सारी
देवावर मात्र सगळेच रंग वारी
तल्लीन करणारा रंग म्हणजे केशरी रंग
या ऊर्जा देणाऱ्या रंगात नेहमी भक्ती असतें संग
दुरून दिसताच हा करतो डोळ्यांना दंग
शरीरावर पडतो तेव्हा होत भावपुर्ण अंग
होळीच्या या रंगांचे दावेदार हजारी
मालदार चोपदार सगळे या रंगांवर वारी
वारकरी खेळतात रंग येऊन दरबारी
होळीच्या या रंगांची किमयाच न्यारी
अशे हे होळीतले भारताचे रंग आहे भारी
खरच या रंगांची काही किमयाच न्यारी
उधळत मनावर त्याचा उल्हास अंगावरी
नजरेला भिडतात जणू प्रेमाची पिचकारी
नवीन रंग येतो प्रत्येक उल्हासात सणवारी
पण होळीच्या आनंदाची काही बातच न्यारी
रंगवतात संपूर्ण आयुष्य बनून गिरधारी
खरच हे रंग असतात अनमोल अलंकारी
होळीचा उत्सव म्हणजे चमत्कार धारी
उदासीनतेच्या आयुष्यात भरतात रंग हजारी
विसरायला लावतात भेदभाव सारी
खरंच होळीचे रंग आहेत लई भारी
