रमाई
रमाई


काय लिहावे हे सुचतं नव्हते
काय बोलावे हे कळतं नव्हते
कारण माई तुझ्यासाठी तेवढे
शब्दच अस्तित्वात नव्हते..
स्व:ता उपाशी राहुन तु दिला घास माझ्या ओठी..
त्यामुळे पडली होती खळगी तुझ्या पोटी..
जळतं राहिली स्व:ता ह्या विषमता असलेल्या समाज्यात
तरीही नव्हती तक्रार तुझ्या ओठी….
माई तुझ्या साथीमुळे बांबानी केले समाज्याला जागृत
लिहुन हे संविधान केले बहुजणांना अर्पण….
काय सांगु माई आता आजच्या स्त्रियांची कहानी..
विसर पडला आता तुझ्या त्यागाचा मनी…
महिला आता रमली कुटूंबात
कोणती नेसु साडी, कसे घालू दागिने
तिच्यापेक्षा मी कशी भारिचं दिसते
असे पडले प्रश्न या मेलेल्या बुध्दीत…
फक्त संविधानाने दिला
तिला जगण्याचा हक्क
न्याय समता बंधुता आणि प्रेम
असावे आपल्या वागण्यात