STORYMIRROR

vaishali vartak

Action

3  

vaishali vartak

Action

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
195

येता नारळी पौर्णिमा 

आठवितो बंधु राया

बांधू धागा विश्वासाचा 

बंधुत्वाची वसे माया


श्रावणाच्या पौर्णिमेला 

दिन रक्षा बंधनाचा

बांधे बहीण भावास

धागा प्रेम रक्षणाचा


राखी बांधता भावास 

जरी असता लहान

उभा राहातो पाठीशी 

प्रेमच तयाचे महान


सण रक्षाबंधनाला

धाव घेई भावापाशी

त्याच्या प्रेमळ मायेची

नाही तुलना कोणाशी


बहिणीच्या प्रेमापायी

पहा किती करी माया

सय येता माहेराची

आठवितो भाऊराया


कृष्ण भाऊ द्रौपदीचा

पहा कसा तिच्या पाठी

येता प्रसंग कठीण

राही उभा सदासाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action