STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy Inspirational

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
220

काल सिमेंवर लढताना शत्रूंशी

 तो भाऊ मारला गेला,

आज बहिणीला पडला प्रश्न 

 बांधू राखी ही कुणाला...


फोन करून म्हणाला होता

 रक्षाबंधनाला येईन,

ताई तुझ्या हाताने मी 

नक्की राखी बांधून घेईन.


भेटून सर्वांना निरोप घेऊन

 गावाकडे निघाला,

अन् शत्रूंनी अचानक

 हल्ला छावणीवर केला.


विरश्री संचारली अंगी

 घेतले शस्त्र हाती,

शत्रूवरती तुटून पडला

 धाडस विराचे किती...


मातृभूमीच्या रक्षणासाठी नव्हती पर्वा जिवाची,

आई, वडील, बहिण सर्व वाट पाहत होते त्याची.


झेलीत होता गोळ्या छातीवर

 शत्रूला मारीत होता,

वंदे मातरम्, भारतमातेचा

 जयजयकार करत होता.


रक्ताने माखलेला देह

वीर धारातीर्थी पडला,

मातृभूमीच्या रक्षणार्थ

 प्राण त्याने सोडला.


रक्षाबंधनाचा सण 

वाट पाहत होती बहिण,

आई वडील होते तयार

 स्वागताला आनंदान.


दारी पाहून शव भावाचे

 टाहो बहिणीने फोडला,

म्हातारे ते आई-बाप 

धीर त्यांनी सारा सोडला.


तिरंग्यात गुंडाळलेला भावाचा

 मृतदेह पहाते बहिण,

कशी बांधावी राखी भावाला

 कसला रक्षाबंधन...


रक्षाबंधनाच्या दिनी

 हवे वचन तुमचे तिला,

देश रक्षणाचे द्या सारे 

आज वचन या बहिणीला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy