रिता होऊनी गेला
रिता होऊनी गेला
ती भिजली
तो भिजला
प्रेमांकुर खुलला (१)
तो आडोसा
ती सलज्ज
आवेग घुसमटला (२)
तो जलद
ती प्रणित
प्रणय खुलला (३)
तो आवेशीत
ती मदहोशीत
देह्-भान हरपला (४)
तो निरंतर
ती प्राशित
भाव बहकला (५)
तो-ती अलग
लजित मग
रिता होऊनी गेला (६)