STORYMIRROR

Pranali Deshmukh

Abstract

4  

Pranali Deshmukh

Abstract

रिनोव्हेशन

रिनोव्हेशन

1 min
348

खूप दिवसांपासून ठरवतेय 

मला काही सांगायचं आहे ,

मला माझं इनोव्हेशन करायचं आहे ...

यंदा घराचं रिनोव्हेशन करायचं आहे ...

उंबरा झिजलाय कित्येक पावसाळे 

एकटाच भिजलाय ,

खिडकीच्या काचा धूसर झाल्यात ,

नंबर वाढलाय .

दाराच्या चौकटी खिळखिळ्या झाल्यात ,

कॉलबेलला ओळखीच्या स्पर्शापासून 

लांबायचं आहे .

मला काही सांगायचं आहे .

नात्यांचे माळे चढवतांना 

आयुष्य सरायला आलय .

हल्ली जिना चढून भेटीगाठी घेणं 

मला जमत नाही .

बंद दारावरची नावाची पाटी वाचून 

परतल्यावर मन रमत नाही .

कुलूप लावून दारांना निवांत 

थांबायचं आहे .

मला काही सांगायचं आहे .

दातांचं फर्निचर अधून मधून हलतंय ...

थंड ,गरम आजकाल सगळंच सलतंय ...

काश्मिरी गालिच्यावर सुरकुत्या आल्यात ...

डोळ्याच्या खाचा डागाळलेल्या 

पाणी साचलेलं पांगायचं आहे ,

मला काही सांगायचं आहे ...

देव्हाराही बदलेल पण 

देव बदलणार नाही ...

रिनोव्हेशन करतांना मूळ वास्तूला

इजा होणार नाही ...

चालतांना मागे वळून बघायचं आहे ..

मला परत नव्याने जगायचं आहे 

मला काही सांगायचं आहे ...

मला माझं इनोव्हेशन करायचं आहे ...

यंदा घराचं रिनोव्हेशन करायचं आहे ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract