STORYMIRROR

Pranali Deshmukh

Romance Others

4  

Pranali Deshmukh

Romance Others

लाट

लाट

1 min
197

वृत्त वनहरिणी (मात्रा 8+8+8+8)


भेटीसाठी पाश तोडुनी लाट किनाऱ्यावरती येते 

शंख शिंपले खारट मोती ओंजळ भरुनी त्याला देते


उभा किनारा वाट पाहतो अशी कशी ही प्रीत आंधळी

देहावरती हात फिरावा आशेवरती लाट वेंधळी


पुसतो ओल्या तिच्या वेदना कवेत त्याच्या शिरल्यावरती 

स्पर्शाने तो हर्षुन जातो मिठात जखमा मुरल्यावरती


मुक्कामाचा नसे आग्रह उथळ किनारा रोखत नाही

अधिकाराने हात न धरता ती जातांना टोकत नाही


जातांना ती मागे वळते डोळे भरुनी बघण्यासाठी 

आवेगाने खड्डा करते खुणा ठेवुनी जगण्यासाठी


इजा कधी का होते त्याला लाट उसळता वाळूवरती 

कोरडलेला काठ रुपेरी क्षण मोहाचा टळल्यावरती


ओसरतांना मुठीत वाळू आठवणींची ओटी भरतो  

रुतणारी सल तिची ऐकुनी परक्याचे धन स्वाधीन करतो


उरात लाटा पाझरतांना ओस किनारा कोरडलेला 

काठावरती वाळू बनुनी गर्दी नसता ओरडलेला


अफाट सागर तिच्याच नावी उरात उसळे काही व्यथा

खळखळून ती हसते बिसते मुक्याच असती गृहीत कथा


पाठीवरती लाट घेऊनी रत्नाकर मानी गुरगुरतो 

साथ सोडुनी जाता लाटा कुबेर असुनी वेडा झुरतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance