STORYMIRROR

Pranali Deshmukh

Tragedy Others

3  

Pranali Deshmukh

Tragedy Others

मला तुला मनातून काढायचं आहे

मला तुला मनातून काढायचं आहे

1 min
205

कोमेजण्या आधी देठापासून फुल

तोडायचं आहे 

मला किनई तुला मनातून 

काढायचं आहे ....

खरं सांगू !

तुझ्या माझ्यात असायचा फक्त तू 

मला फुलविणारा हक्काचा ऋतू 

तुझ्याशिवाय मला वाढायचं आहे 

मला किनई तुला मनातून 

काढायचं आहे ....

ऐकतोस ना !

विस्कटलंय मन जरा आवरून घेते 

चुकता चुकता जरा सावरून घेते 

कोपऱ्याकापऱ्यातून झाडायचं आहे 

मला किनई तुला मनातून 

काढायचं आहे ....

बघ ना !

मन उजवणारा सण तुझी आठवण 

तुळशीविना अपूर्णच वृंदावन 

तुटलेल्या मला माझ्याशी 

परत जोडायचं आहे 

मला किनई तुला मनातून 

काढायचं आहे ....

समजलं ना !

सोडून जातांना चुकून आठवशील का ?

तुझाही एक ठोका चुकून पाठवशील का ?

अर्धवट लिहलेले नाव पूर्ण खोडायचं आहे 

मला किनई तुला मनातून 

काढायचं आहे ....

बोल ना !

माझ्यातल्या तुला वेचता येत नाही 

किती किती सामावलाय मोजता येत नाही 

काही नियम लिहतांना काही मोडायचं आहे 

मला किनई तुला मनातून 

काढायचं आहे ....

कळतंय ना ! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy