रिमझिम पावसात
रिमझिम पावसात
रिमझिम पावसाच्या गाण्यात
मी प्रेमाचे गीत गात असताना
तू माझ्याकडे बघून हसत होती
पावसात येण्याचं खुणावत होती
तेव्हा माझ्या गाण्यातले ढगही
जरा जास्त गरजायला लगले
मी पाहत होतो तुला
सरींना कवेत घेताना
तू सडा फुलांचा वेचत होती
तेव्हा तुला नसेल वाटत पण मला वाटायचं
फुले वेचायला तुला
मदत करावी
पण फुले तुझ्या कवेत
जास्तच लाडावलीत
चिंबचिंब भिजतानाही
तू तुझ्या वेणीसाठी गजरा केला
वाटलं मला बोलवशील
वेणीला गजरा लावायला
पण तेव्हाच माझ्या गाण्यात
पाऊस खवळला आणि
तुझ्यावरच जास्त मेहरबान झाला
तेव्हा मी पाहत होतो
तुझं भिजलेलं रूप
खरंच तू खूप सुंदर दिसत होती
आणि तुला पाहून माझ्या
भावनांची बागही फुलत होती
काय माझ्या गाण्याचा शेवट असेल मला माहीत नाही
पण माझ्या हृदयातल्या परडीतील फुलांना
तू वेचलेल्या फुलांची
सोबत हवी आहे
देशील की नाही मला माहित नाही
पण...हो....
माझं पावसाचं गाणं संपल्यावर
मी तुला शोधणार आहे
भेटण्यासाठी......

