रडू नको
रडू नको
कित्येक वार आरपार ते जाहले तरी रडू नको
माणुसकीतील झरे सारेच आटले तरी रडू नको
धावशील तू कुठवर आता जाशील कुठे धरणीवर
डोक्यावरचे आभाळ पूर्ण फाटले तरी रडू नको
पावसातील थेंब गोठले मनी साठले जलबिंदू
फोडू नकोस हुंदके कंठ दाटले तरी रडू नको
वाळवंटात रक्त गोठले जीवनाची ही दुर्बलता
हिमालयातील पहाड वितळू लागले तरी रडू नको
आपले कुणी राहिले कुठे उगा जीवास फसवतोस
पापण्यातून रक्त जरासे सांडले तरी रडू नकोस