रात्र
रात्र
रात्रीला सूर्याचा लोभ का असावा ?
त्याच्यासाठी तिचा जीव का असा जळावा
साथ तिला त्याची मिळेल शक्य नाही
तरी त्याची अखंड वाट पाहत राही
नकळत का सूर्य तिच्या मनी विसावा....
पण मात्र ,रात्रीला सूर्याचा लोभच का असावा ?
चंद्र असता साथी जीव भास्करी का जडवा?
अडवले जरी स्वतःला तरी तोल अलगद जावा
नशीबी दोघे नसले तरी घ्यास त्याचा असावा....
रात्रीला दिवसाचे ग्रहण असताही,
न जाणे दोघांचा कुठपर्यंतचा दुरावा.....
इतकं असून ही ,रात्रीला सूर्याचा लोभ का असावा ?
भास्करच्या विरह तिनेच का सहावा
कोण जाने यामागे तिचा स्वार्थही असावा
त्याच्या नसण्याने जरी तिला पूर्णत्व आहे
ती नसताना जसे त्याचे महत्व आहे
प्रवास दोघांचा एकट्याने जरी असला,
तरी सोबत चालत राहणार...
म्हणून कदाचित, रजनीला सूर्याचा लोभ असावा ..

